About Us

रासपती दास हे एक आध्यात्मिक शिक्षक (Spiritual Educator) आहेत. गेल्या १६ वर्षांपासून ते भगवद्गीतेचे ज्ञान विविध सेमिनार्स आणि कोर्सेसद्वारे विद्यार्थी, युवक, शिक्षक, प्रोफेसर्स, कॉर्पोरेट लीडर्स, गृहिणी इ. सर्वांना सोप्या भाषेत शिकवत आहेत. आजपर्यंत हजारो व्यक्तींनी त्यांच्या कार्यक्रमांचा लाभ घेतलेला आहे. "तत्त्वमेट फोरम" (TattvaMate Forum) ह्या ऑनलाईन कम्युनिटी द्वारे आणि YouTube द्वारे त्यांचे कोर्सेस आणि कार्यक्रम जगभर पाहिले जात आहेत.

तुम्हीही "तत्त्वमेट फोरम" कम्युनिटी चे मेंबर बना, आणि ह्या कार्यक्रमांचा लाभ घ्या.

श्री. रासपती दास यांचा जन्म एका पारंपरिक महाराष्ट्रीय परिवारात झाला आणि त्यांनी ज्ञान प्रबोधिनी मधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना Science आणि Creation (विज्ञान आणि वैश्विक उत्पत्ती) याबद्दल विलक्षण आकर्षण होते, विशेषतः Astronomy and Astrophysics या विषयांकडे त्यांचा ओढा होता.

त्यांनी Pune Institute of Computer Technology येथून B.E. E&TC (with distinction) पूर्ण केले. त्यानंतर Cybage Softwares, Pune येथे Software Developer म्हणून कार्य केले.

Engineering शिक्षणाच्या काळात ISRO ने International Astronautical Congress साठी त्यांची संपूर्ण भारतातून top 100 students मध्ये निवड झाली होती.तरुणपणी त्यांचा भगवद्गीतेसोबत परिचय झाला. तेथे त्यांच्या सर्व वैज्ञानिक प्रश्नांचे आणि जीवनाच्या उद्दिष्टांचे उत्तर मिळाले, ज्यामुळे ते अध्यात्माच्या मार्गाकडे वळले. 2011 पासून त्यांनी आपले जीवन आध्यात्मिक जीवनाच्या आणि भगवद्गीतेच्या प्रचारासाठी पूर्णपणे समर्पित केले आहे.

श्री. रासपती दास भगवद्गीतेवर आणि इतर वैदिक शास्त्रांवर IITs, NITs आणि इतर अनेक शाळा आणि महाविद्यालयांमधील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, तसेच कॉर्पोरेट लीडर्स, प्रोफेशनल्स यांच्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत. तसेच, Self-Management, Positive Thinking, Power of Habits, Gita in a Nutshell, Journey of Self Discovery, Science of the Soul, Living with Purpose, Mindful Living, The Science of Meditation, Art of Teaching, Art of Parenting यासारख्या अनेक विषयांवर आधारित अनेक सेमिनार आणि कोर्सेस घेतात. त्यांचे कार्यक्रम अनेक युवक, प्राध्यापक आणि कॉर्पोरेट्स यांना प्रेरणादायी ठरलेले आहेत.

श्री. रासपती दास हे भगवद्गीतेचे मराठी भाषेत Online Teacher सुद्धा आहेत, जिथे ते गहन आध्यात्मिक तत्त्वज्ञान अतिशय सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत मांडतात. YouTube वरील हजारो Subscribers त्यांच्या कार्यक्रमांचा लाभ घेत आहेत.

मागील 12 वर्षांपासून Vrajdham VOICE – Jet Age Gurukul या विद्यार्थ्यांसाठीच्या Residential Spiritual Training Centre मध्ये Project Advisor and Mentor आहेत.

Advanced Spiritual Studies and Teaching Skills मध्ये Certified आहेत — जसे Bhakti Shastri, Bhakti Vaibhav (pursuing) तसेच Teacher Training Courses (TTC 1 & 2) etc. श्री. रासपती दास यांना Youth Guide, Public Speaker, Educator आणि Spiritual Mentor म्हणून 16 वर्षांहून अधिक अनुभव आहे.


तुम्हीही "तत्त्वमेट फोरम" कम्युनिटी चे मेंबर बना, आणि ह्या कार्यक्रमांचा लाभ घ्या.

- brought to you by -

Krishna Vani Media

krishnavanimedia@gmail.com

&
TattvaMate Forum (Marathi)

marathi.rasapatidas@gmail.com